(म्हणे) ‘आम्ही निष्पक्ष बातम्या देत राहू ! – बीबीसीचा दावा

६० घंट्यांनंतर बीबीसीच्या कार्यालयांतील आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले !

नवी देहली – आयकर विभागाकडून चालू असलेले बीबीसीच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांतील सर्वेक्षण ६० घंट्यांनंतर संपले आहे. या संदर्भात बीबीसीच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी देहली आणि मुंबई येथील आमची कार्यालये सोडली आहेत. आम्ही आयकर विभागाला सहकार्य करत राहू. लवकरच हे प्रकरण निकाली निघेल, अशी आशा आहे. आमचे वाचक, श्रोते आणि दर्शक यांना निष्पक्षपाती बातम्या देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही एक विश्वासार्ह, निष्पक्ष, आंतरराष्ट्रीय आणि स्वतंत्र माध्यम आहोत. (यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक) आम्ही आमचे सहकारी आणि पत्रकार यांच्या पाठीशी उभे आहोत जे कोणतीही भीती किंवा लोभ न बाळगता बातम्या देत रहातील.

संपादकीय भूमिका

बीबीसीकडून निष्पक्षपणे बातम्या देण्याच्या दाव्यावर कोणताही धर्माभिमानी हिंदु आणि राष्ट्रप्रेमी नागरिक विश्वास ठेवू शकणार नाही, इतके ते सत्य आहे !