अंनिसच्या कार्यक्रमांना दिलेली अनुमती रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख म्हणाले, ‘‘मी अनुमती दिलेली नाही. कदाचित् प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी अनुमती दिलेली असावी.’’

गोंदे (जिल्हा नाशिक) गावात ८० हून अधिक भूकंपाचे धक्के !

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गोंदे गावी तब्बल ८० हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे संशोधनही झाले; पण कारणे अद्याप समोर आलेली नाहीत.

सोलापूर महानगरपालिकेचे १ सहस्र ७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर !

सोलापूर महानगरपालिकेला विविध गोष्टींतून मिळणारे उत्पन्न ६७७ कोटी २७ लाख ४७ सहस्र रुपये दाखवण्यात आले असून भांडवली कामांसाठी उपलब्ध होणारी रक्कम ७० कोटी ४८ लाख रुपये इतकी दाखवण्यात आली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी !

चेंबूरमधील भूलिंगेश्वर येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सनातनच्या ग्रंथांविषयीची विस्तृत माहिती साधकांकडून जाणून घेतांना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर

वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिहानमध्ये १ लाख तरुणांना देणार रोजगार ! -नितीन गडकरी

प्लास्टिकपासून क्रूड पेट्रोल काढण्याचा नवीन प्रकल्प मी चालू करत आहे. ३ मासांत प्रकल्प चालू होईल. हे पेट्रोल डिझेलमध्ये वापरता येईल. त्यावर ट्रक आणि बस चालू शकेल.

महान भारताचा गौरव विद्यार्थ्यांच्या हातात आहे ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

विद्यार्थ्यांनो, ‘घरातून बाहेर जातांना आई-वडिलांच्या पाया पडूनच बाहेर पडणार’, ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही’, ‘ताटात अन्न टाकून देणार नाही’, असे लहान लहान संकल्प करा.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे बोट धरूनच मी पुढे जात आहे ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व युगांमध्ये आदरणीय आहेत. त्यांनी सार्वभौमत्व आणि समता यांचे दिलेले विचार आजही मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय लवकरच खुले होईल.

अतीवृष्टी अनुदान घोटाळ्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वैजापूर तहसीलदारांना जिल्हाधिकार्‍यांची कारणे दाखवा नोटीस !

शेतकर्‍यांना दोनदा अनुदान वाटपप्रकरणी तहसीलदार गायकवाड हे दोषी असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची वरवरची कारवाई करण्यापेक्षा कठोर कारवाई करणे आवश्यक !

राजस्थानमधील पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.च्या धाडी !

कोटा येथे ३, तर जयपूर, सवाई माधोपूर, बुंदी आणि भिलवाडा येथे प्रत्येकी एका कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकण्यात आली. ही कारवाई गोपनीय ठेवण्यात आली असून काही कागदपत्रे आणि संदिग्ध साहित्यही कह्यात घेण्यात आले आहे.

मारहाणीचा गुन्हा नोंद असलेल्या बांगलादेशी घुसखोराचे २७ वर्षांपासून मुंबईत अवैध वास्तव्य !

२७ वर्षांपासून अवैधपणे भारतात रहाणार्‍या घुसखोराविषयी माहिती नसणे, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !