महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे ४०० हून अधिक प्रदर्शन कक्ष !

सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पहार्‍यासाठी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.

पुणे येथे सनातन संस्थेकडून श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन !

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ध्वनीप्रदूषणामुळे पर्यटनावर विपरित परिणाम ! – प्रदूषण नियंत्रण मंडळ

राज्यात एकूण १२ ठिकाणी ध्वनीची तीव्रता मोजणारी यंत्रे बसवली जाणार आहेत. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांचे कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात

बाणावली किनार्‍यावर काही पत्रकारांनी अक्षता मूर्ती यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, ‘‘गोवा पुष्कळ सुंदर आहे. येथील वातावरण मला पुष्कळ आवडते. आम्ही सुट्टीत निवांतपणा अनुभवण्यासाठी येथे आलो आहोत.’’

प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी वापरणार असल्याचा कर्नाटकचा दावा खोटा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

कर्नाटक वारंवार धरणाचे बांधकाम पिण्याच्या पाण्यासाठी करत असल्याचा दावा करत असले, तरी कर्नाटकने पाण्याचा योग्य विनियोग कसा करता येईल यासंबंधी कोणतीही कृती केलेली नाही.

नवी मुंबई महापालिकेच्‍या ‘पे आणि पार्किंग’च्‍या कामावर देखरेखीसाठी भरारी पथक !

महापालिकेच्‍या ‘पे आणि पार्किंग’च्‍या कामाविषयी तक्रारी प्राप्‍त झाल्‍याने कामावर देखरेख ठेवण्‍यासाठी भरारी पथक नेमण्‍याचे आदेश महापालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

इंदापूर (पुणे) येथील अवैध पशूवधगृह उद़्‍ध्‍वस्‍त करावे !

ज्‍या महाराष्‍ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्‍म झाला, त्‍याच महाराष्‍ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची मागणी करण्‍यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्‍जास्‍पद आहे !

तीर्थक्षेत्रांविषयी राजकारण्यांचे नव्हे, धर्मशास्त अभ्यासकांचे मत ग्राह्य धरावे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

इतिहास, धर्मशास्त्र, तीर्थक्षेत्र यांविषयी राजकीय व्यक्तींनी भाष्यच करू नये. हा अधिकार ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास करणार्‍यांचा किंवा धर्मशास्त्राच्या अभ्यासकांचा आहे- सुधीर मुनगंटीवार

म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीचा खारटपणा वाढणार !

म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीच्या पाण्याची क्षारता वाढेल. त्यामुळे पश्चिम घाट आणि अन्य वनांतील वन्यजीव यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हादईचे पाणी वळवल्याने विहिरी आणि अन्य जलस्रोत सुकणार आहेत.

प्रशासकीय अधिकार्‍याला मारहाण केल्‍याप्रकरणी मुंबईतील माजी नगरसेवकाला अटक !

लांडगे यांना अटकेच्‍या निषेधार्थ त्‍यांच्‍या समर्थकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्‍याबाहेर निदर्शने केली.