लसीकरणाचे ढिसाळ नियोजन !

‘दळणवळण बंदी’मुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात जे काही यश मिळत आहे, ते बाजूला राहून लसीकरण केंद्र केंद्रावर होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे कोरोनावर निर्बंधात्मक ठरण्याऐवजी ‘प्रसारा’चे केंद्र होत चालले आहे. अनेक लसीकरण केंद्रे बंद किंवा त्यांच्या क्षमतेच्या ५-१० टक्केच लोकांना लस देत आहेत….

कुख्यात गुंड छोटा राजन याच्या मृत्यूची अफवा

येथील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला अशी अफवा ७ मे या दिवशी पसरली होती…..

आमदार निधीतून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी व्यय करण्यास राज्यशासनाची मान्यता !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यशासनाने शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रुग्णालये यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला..

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद घायाळ

मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्या संसदेचे अध्यक्ष असलेले महंमद नशीद हे ६ मे या दिवशी त्यांच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात घायाळ झाले. त्यांना उपाचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू रुग्णालयात भरती

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याच्या माहितीनंतर येथे मोठ्या संख्येने त्यांचे भक्त गोळा झाले.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोविड केंद्रात एका दिवसासाठीचे शुल्क १५ ते २५ सहस्र रुपये !

सर्वच मंत्रांमुळे होणार्‍या परिणामांचे संशोधन करणे आवश्यक !

केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांंचा निधी दिला आहे.

‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर होणार संशोधन !

केवळ गायत्री मंत्रच नव्हे, तर अन्य मंत्रांचा अन्य कोणत्या आजारांच्या निर्मूलनासाठी उपयोग होतो, याचेही आता संशोधन केले पाहिजे !

एकही खाट रिकामी नसतांना आता ३ सहस्र २१० खाटा एका दिवसात रिकामी !

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी शहरातील रुग्णालयांमधील खाटा मिळण्यासाठी लाच घेण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर आता रुग्णालयांत ३ सहस्र २१० खाटा रिकामी असल्याचे या संदर्भातील संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे.

पुणे शहराला ५० टन ऑक्सिजनची आवश्यकता

सर्व रुग्णालयांना मिळून सध्या प्रतिदिन ४० ते ४२ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासते परंतु तेवढासुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.