मंदिरांच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या ५ वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपये संमत !

पर्यटनाला चालना मिळण्याचा मानस ! केवळ पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाला आध्यात्मिक लाभ होईल, या दृष्टीने मंदिरांचा विकास व्हायला हवा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्र आणि धर्म यांचे विचार आपण पुढील पिढीला दिले पाहिजेत ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, कणेरी मठ, कोल्हापूर

सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या तिघींनी काय हालअपेष्टा सोसल्या ? ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकर यांच्या विचारांचे जागरण

सावरकरांनी जातींमध्ये विभागलेला हिंदु समाज एक होण्यासाठी केलेले कार्य, अंदमानात सहन केलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत केलेले सामाजिक कार्य, विज्ञान विचार, नाट्य, साहित्य लेखन याविषयी स्पर्धकांनी विचार मांडले.

‘हिंदुफोबिया’ची (हिंदुद्वेषाची) भयावह स्थिती !

जगात विविध ठिकाणांहून कानावर येणार्‍या ‘हिंदुफोबिया’ म्हणजेच हिंदुद्वेष आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना, ही गंभीर अन् चिंतेची गोष्ट आहे. अनेक देशांमध्ये हिंदु व्यक्ती, प्रतीके, मंदिरे इत्यादींवर होणारी आक्रमणे, ही नित्याचीच झाली आहेत.

लोहरदगा (झारखंड) येथील १३ हिंदूंची घरवापसी !

जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो.

ज्ञानवापी प्रकरणी सर्व ७ खटल्यांची सुनावणी एकत्र होणार !

ज्ञानवापीच्या प्रकरणी चालू असलेल्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात एकत्र करण्यात येणार आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

मंदिर तीन टप्प्यांत बांधले जात असून पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. पहिल्या टप्प्यात तळमजल्यावरील इतर कामांव्यतिरिक्त ५ मंडपांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

त्रावणकोर देवास्वम् बोर्डकडून मंदिरांच्या परिसरात संघाच्या शाखा आयोजित करण्यावर पुन्हा बंदी !

त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने पुन्हा एकदा त्याच्या अखत्यारीत असणार्‍या मंदिरांना मंदिराच्या परिसरात रा.स्व. संघाच्या शाखा आणि शस्त्र प्रशिक्षण आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे.

नाकर्तेपणावर मलमपट्टी 

सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.

२१ ते २८ मे या कालावधीत महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘वीर सावरकर गौरव यात्रे’च्या निमित्ताने…

आर्यावर्त, भारतभूमी इत्यादी आपल्या मायभूमीची आपणास प्रिय असलेली प्राचीन नावे, अर्थातच सुसंस्कृत लोकांना प्रिय रहातील. आमच्या मायभूमीला ‘हिंदुस्थान’ याच नावाने संबोधले पाहिजे.