थिरूवनंतपूरम् (केरळ ) – त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने पुन्हा एकदा त्याच्या अखत्यारीत असणार्या मंदिरांना मंदिराच्या परिसरात रा.स्व. संघाच्या शाखा आणि शस्त्र प्रशिक्षण आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे. यापूर्वी वर्ष २०१६ आणि वर्ष २०२१ मध्ये बोर्डाने या संदर्भात परिपत्रक काढून आदेश दिला होता; मात्र काही ठिकाणी याचे पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे तेथील काही अधिकार्यांवर कारवाईही करण्यात आली होती.
https://t.co/1SWr4CUpWa@RSSorg
तिरुअनंतपुरम, पीटीआई। केरल में मंदिरों का प्रबंधन करने वाले त्रावणकोर देवस्वम बोर्ड (टीडीबी) ने एक नया सर्कुलर जारी किया है, जिसमें अधिकारियों से आरएसएस की शाखाओं की गतिविधियों पर प्रतिबंध लगाने संबंधी उसके पहले के आदेश का सख्ती से पालन करें।— राष्ट्र ही Head,Heart,Hand,सतत,सेवा,समर्पण, (@nirmal_dr) May 22, 2023
१. बोर्डाच्या अधिकार्यांनी सांगितले की, पूर्वीच्या परिपत्रकाचे पालन नीट होत नसल्याने नवीन परिपत्रक काढण्यात आले आहे. यातून मंदिर परिसरात संघाच्या आयोजित होणार्या शाखा रोखण्यात येणार आहेत.
२. वर्ष २०१६ मध्ये तत्कालीन देवस्वम् मंत्री कडकम्पल्ली सुरेंद्रन् यांनी आरोप केला होता की, संघाकडून मंदिराचा वापर शस्त्रसाठा करण्यासाठी केला जात आहे. या संदर्भात सरकारकडे तक्रारी आल्या आहेत.’ यानंतरच बोर्डाकडून परिपत्रक काढून संघाच्या शाखांना मंदिरांच्या परिसरात बंदी घालण्यात आली.
संपादकीय भूमिकामंदिरांमध्ये इफ्तारच्या मेजवान्या करण्यास बोर्डाकडून अनुमती कशी दिली जाते ? हे हिंदु धर्मविरोधी नाही का ? |