अयोध्येतील श्रीराममंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा पहिला टप्पा यावर्षी ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.

मिश्रा पुढे म्हणाले, ‘‘मंदिर तीन टप्प्यांत बांधले जात असून पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. पहिल्या टप्प्यात तळमजल्यावरील इतर कामांव्यतिरिक्त ५ मंडपांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ही सर्व कामे या वर्षी ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, तर मंदिराच्या पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यांवरील कामे पुढील वर्षी ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी १ सहस्र ४०० कोटी ते १ सहस्र ८०० कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे.’’