५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेंगळुरू येथील चि. वेदांत श्रवण कलबुर्गी (वय ३ वर्षे) !

आम्ही वेदांतला घेऊन समाजातील एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर तेथील रज-तम वातावरणामुळे त्याची चिडचिड होते. आम्ही त्याला मंदिरासारख्या सात्त्विक ठिकाणी घेऊन गेलो, तर ते त्याला आवडते.

सद्गुरुपदावर विराजमान असूनही व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणारे आणि साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६२ वर्षे) !

व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक आणि संपर्कात येणार्‍या व्यक्ती यांचे निरीक्षण करून ते त्यांना साधनेत साहाय्य म्हणून त्यांच्यातील उणिवा सांगतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगामध्ये श्रीमती मनीषा केळकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

 १. ‘साधकांच्या प्रत्येक क्षणाचा वापर साधनेसाठी व्हायला हवा’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कटाक्ष असणे ‘एके दिवशी रामनाथी आश्रमात आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) भावसत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. भावसत्संग चालू असतांना गुरुदेवांची औषधे घेण्याची वेळ झाली. त्या वेळी गुरुदेवांनी सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी टक्के ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सौ. … Read more

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा झालेल्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त सातारा जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मी त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करत असतांना त्यांच्या छायाचित्रामध्ये ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले झुल्यावर बसले आहेत’, असे मला स्पष्टपणे दिसले. मी ३ मिनिटे भावावस्था अनुभवली.

कौटुंबिक अडचणींना धीराने सामोरे जाऊन गुरुचरणांशी स्थिर रहाणार्‍या खारघर, नवी मुंबई येथील सौ. शकुंतला मोहन बद्दी (वय ६२ वर्षे ) !

वर्ष १९९७ ते २००२ पर्यंत माझ्या यजमानांना ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’(मोठ्या आतड्याचा दीर्घकालीन दाहक प्रकारचा आजार) हा अत्यंत त्रासदायक आजार झाला. माझी मुले लहान होती, तरी मला कसलीच भीती वाटली नाही.

हिंदू समाज धर्म विसरल्याचाच हा परिपाक !

‘धर्मांधांना त्यांच्या धर्माकडून शक्ती मिळते; म्हणून ते धर्मासाठी आत्मसमर्पणही करतात. याच्या उलट हिंदू हे धर्म विसरल्यामुळे त्यांना काडी इतकीही किंमत (शक्ती) नाही.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’च्या वेळी साधकाला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

गुरूंच्या सान्निध्यात १० सहस्र साधकांच्या समवेत साजरा झालेला हा सोहळा, म्हणजे सनातनचा एक कुंभमेळाच होता. या सोहळ्याच्या वेळी सर्व साधक चैतन्यात न्हाऊन निघाले.

हिंदूंमध्ये धर्मप्रेम नसल्याचा हा आहे परिणाम !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात त्या त्या पंथियांची एकजूट असते. याउलट हिंदूंमध्ये तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी (धर्मद्रोही) धर्माविषयी विकल्प निर्माण करत असल्याने हिंदूंमध्ये धर्मप्रेम नाही. त्यामुळे त्यांची एकजूट नाही आणि ते इतर धर्मियांकडून प्रतिदिन मार खातात.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेचा ‘ऑनलाईन’ साधना सत्संग आणि प्रवचने यांमुळे धर्मकार्याने विहंगम गतीने घेतलेली गरुडझेप !

सनातनचे अनेक उपक्रम ‘ऑनलाईन’ चालू झाले होते. त्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक या उपक्रमात जोडले गेले. या माध्यमातून मार्गदर्शन मिळवून ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते, तसेच सनातनचे हितचिंतक साधना करू लागले.

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण क्रमशः येथे देत आहोत.