‘सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ब्रह्मोत्सवातील विविध घटनांच्या वेळी जाणवलेली सूक्ष्मातील स्पंदने
टीप १ – साधकांनी सूर्यनारायणाला प्रार्थना केल्यानंतर १० मिनिटांतच सूर्याची प्रखरता २० टक्के न्यून झाली. त्या वेळी मंडपातील साधकांना उन्हाची झळ लागत नव्हती. उलट त्यांना शीतल वारे जाणवत होते.
टीप २ – या वेळी सर्व साधकांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. तेव्हा मला शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन झाले. त्या वेळी माझ्याकडून गुरूंच्या समवेत सर्व साधकांनाही नमस्कार केला गेला.
टीप ३ – या वेळी मला निर्विचार अवस्था अनुभवता आली.
टीप ४ – ‘गुरु आमचे रक्षण करतात आणि ते प्राणदाते आहेत’, हे मला प्रकर्षाने जाणवले.’
२. इतर सूत्रे
अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘उत्तराधिकारी पत्र’ प्रदान केले. त्या वेळी ‘साधकांना सूक्ष्मातून चक्र आणि गदा यांचे संरक्षककवच प्राप्त झाले’, असे मला जाणवले.
आ. जेव्हा साधकांनी ‘गोविंदा…’ हा जयघोष केला, तेव्हा वातावरणात श्रीविष्णुतत्त्व ३८ टक्के होते. त्या वेळी ‘मी तिरुपति येथे आहे’, असे मला जाणवले.
इ. ‘ऋषिमुनी आणि देवीदेवताही या सोहळ्यात सहभागी होते’, असे मला जाणवले.
ई. गुरूंच्या सान्निध्यात १० सहस्र साधकांच्या समवेत साजरा झालेला हा सोहळा, म्हणजे सनातनचा एक कुंभमेळाच होता. या सोहळ्याच्या वेळी सर्व साधक चैतन्यात न्हाऊन निघाले.
उ. त्या दिवशी सकाळपासूनच मला सूक्ष्मातून प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अस्तित्व जाणवत होते.
ऊ. माझी भावजागृती क्वचित्च होते; पण ‘या सोहळ्याच्या वेळी माझी सतत भावजागृती होत होती’, ही प.पू. गुरुदेवांचीच कृपा आहे.
ए. या सोहळ्याची फलनिष्पत्ती ८८ टक्के होती.
ऐ. या सोहळ्यात साधकांना सरासरी २ टक्के आध्यात्मिक लाभ झाला.
‘वरील लिखाण करण्याची बुद्धी आणि ऊर्जा तीन गुरूंनीच मला दिली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– आधुनिक पशूवैद्य (डॉ.) अजय जोशी (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), फोंडा, गोवा. (१२.५.२०२३)