‘म्हादई’चे पाणी वळवण्याचे प्रकरण आणि ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ घोषित करणे, ही सूत्रे एकमेकांना जोडू नका ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

म्हादई अभयारण्य ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्यास म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवता येणार नसल्याचा विरोधी गटातील सदस्यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी हे आवाहन केले.

पंचांग म्‍हणजे कालमान विश्‍लेषक शास्‍त्र ! – पंचांगकर्ते मोहन दाते, सोलापूर

भारतीय पंचांग शास्‍त्र हे आस्‍तिक लोकांच्‍या भावनांशी सर्वार्थाने जोडलेले आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पंचांगशास्‍त्राची ५ प्रमुख अंगे आहेत. पंचांगशास्‍त्राला विज्ञानाचा आधार आहे.

गोवा : १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा अल्बाज खान पोलिसांच्या कह्यात !

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती संशयित अल्बाज खान याच्या मैत्रिणीसमवेत हडफडे येथील एका रिसोर्टमध्ये सहलीसाठी गेली होती. या वेळी अल्बाज खान याने पीडित युवतीवर बलात्कार केला.

पर्यटकांकडून ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून गोव्याची अपकीर्ती : कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

‘इस्टाग्राम’च्या माध्यमातून गोव्याची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी सरकारने कारवाईचा आदेश दिल्यानंतर सायंकाळी संबंधित युवती मोनालीशा घोष हिने एक चलचित्र प्रसारित करून या प्रकरणी गोमंतकियांची मागितली क्षमा !

गोवा : पिर्ण येथील ३ मंदिरांमध्ये चोर्‍या

गोव्यातील मंदिरांत चोरीच्या घटना चालूच ! हिंदूंची मंदिरे असुरक्षितच !

मणीपूर विषयावरून गोवा विधानसभेत  विरोधकांकडून पुन्हा गोंधळ

विरोधकांनी शून्य प्रहराच्या वेळी सभापतींच्या आसनासमोर जाऊन कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी ‘या प्रकरणी अगोदर सभापतींशी चर्चा करू’, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधकांनी माघार घेतली आणि ते आसनस्थ झाले.

लोकांनी घरी बसवले तरी चालेल; परंतु मांद्रे (गोवा) गावातील जुगार बंद करणारच ! – सरपंच अमित सावंत

मांद्रे गावातील जुगार बंद करण्याची मागणी मांद्रे गावातील महिलांनी माझ्याकडे केली आहे. जुगारामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी जुगाराचे समर्थन करणार नाही – श्री. अमित सावंत, सरपंच, मांद्रे (गोवा)

गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप

बंदी आदेश केवळ कागदोपत्री काढून काय उपयोग ? प्रशासन कार्यवाही का करत नाही ?

‘आय.आय.टी.’साठी लवकरच कायमस्वरूपी भूमी उपलब्ध करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारला ‘आय.आय.टी.’साठी भूमी उपलब्ध करण्यास अपयश आल्याचे सांगितले. त्यावर असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शिक्षणासंबंधी अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना दिले.

विरोधी गटातील ७ आमदारांचे गोवा विधानसभेत असभ्य वर्तन !

विरोधी गटातील सदस्यांनी ३१ जुलै या दिवशी केलेले असभ्य वर्तन अशोभनीय आहे आणि असे वर्तन यापुढे कदापि सहन करणार नाही. विरोधी आणि सत्ताधारी गटांतील सदस्य यांच्या विनंतीवरून आमदारांच्या निलंबनामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे.