रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.

‘ऑनलाईन’ खेळ आणि जुगार यांच्यावर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

प्रत्येक राज्याने या खेळांवर बंदी घालत बसण्यापेक्षा केंद्रशासनानेच देशभरात या खेळांवर बंदी घालायला हवी !

(म्हणे) ‘गोव्यात राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापिठाची स्थापना करा !’ – तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो यांची राज्यसभेत मागणी

गोव्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराचा इतिहास पाहिल्यास हे विद्यापीठही हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनणार नाही कशावरून ?

वास्को परिसरात गायींवर उकळते पाणी टाकणारी टोळी कार्यरत

हिंदूंसाठी गाय मातेसमान आहे. त्यामुळे उकळते पाणी टाकण्यासारखे प्रकार कोणता समाज करत असणार, ते लक्षात येते !

स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करा ! – पू. (सौ.) भावना शिंदे

शिबिरार्थींना संबोधित करतांना पू. (सौ.) भावना शिंदे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे दीप आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करू शकतो.

गोव्यात गेल्या ५ वर्षांत बलात्कार, मुलींचे अपहरण, हत्या आदी गुन्ह्यांच्या प्रतिवर्ष सरासरी प्रमाणात पालट नाही !

गोवा विधानसभा अधिवेशन पणजी, २० जुलै (वार्ता.) – राज्यात वर्ष २०१७ पासून वर्ष २०२२ (जून २०२२ पर्यंत) पर्यंत बलात्कार, हत्या, अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि सायबर गुन्हे आदींमध्ये घट झालेली नाही. विधानसभेत सरकारने दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील गुन्ह्यांसंबंधी तालुकावार, तसेच हळदोणाचे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, बाणावलीचे आपचे आमदार … Read more

कुंकळ्ळी येथील १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला गोव्यातील विविध मंदिरांच्या जलाभिषेकाच्या माध्यमातून मानवंदना

शांतादुर्गा सेवा समितीने कुंकळ्ळी येथील  १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला गोव्यातील विविध मंदिरांच्या जलाभिषेकाच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा उपक्रम राबवला.

राज्यातील ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यातील जी ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत नोंद झालेली नाहीत, ती सर्व स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणण्यात येणार आहेत. त्यानंतर या स्थळांची देखभाल पुरातत्व खाते करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघाचे अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

आश्रम पाहिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. शुक्ला म्हणाले, ‘‘आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. येथील व्यवस्थापन पुष्कळ उत्तम आहे. आश्रमाला लवकरच दुसर्‍यांदा भेट देण्याची प्रबळ इच्छा आहे.’’ 

गोव्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सी सेवे’ला विधानसभेत मान्यता !

काँग्रेसच्या आमदार डिलायला लोबो यांनी ‘टॅक्सी मीटर’ संबंधी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नावर विधानसभेत ही चर्चा झाली. यामुळे राज्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सीसेवा’ चालू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.