गोव्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सी सेवे’ला विधानसभेत मान्यता !

प्रतिकात्मक चित्र

पणजी – गोव्यात ‘ॲप’वर आधारित टॅक्सीसेवा चालू करण्यास विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. टॅक्सीचालक संघटनेचा ‘ॲप’ आधारित टॅक्सीला विरोध आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत विधानसभेत म्हणाले, ‘‘गोव्यात भ्रमणभाषवरील ‘ॲप’वर आधारित टॅक्सीसेवा चालू करणे योग्य ठरणार आहे. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी हे आवश्यक आहे. याला आमदारांनी विरोध करू नये.’’ मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनावर विधानसभेत चर्चा झाली; परंतु सर्व सदस्यांनी मुख्यमंत्र्याच्या विधानाला सहमती दर्शवली. काँग्रेसच्या आमदार डिलायला लोबो यांनी ‘टॅक्सी मीटर’ संबंधी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नावर विधानसभेत ही चर्चा झाली. यामुळे राज्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सीसेवा’ चालू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.