फटाके मर्यादित स्वरूपात लावा ! – सुनील देसाई, अध्यक्ष, सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोंडा

गणेशोत्सव काळात केवळ फोंडा तालुक्यात फटाक्यांवर ५० लक्ष रुपये व्यय (खर्च) केले जातात, तर मग पूर्ण राज्यात किती पैसे खर्च होत असतील ? वर्ष २०१९ मध्ये फोंडा तालुक्यात एकूण ६ ठिकाणी फटाक्यांमुळे भाजण्याच्या  दुर्घटना घडल्या होत्या आणि यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.

गणेशोत्सवात कुटुंबभावना दृढ करूया !

लोकमान्य टिळक यांनी हिंदूंच्या संघटितपणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उत्सव चालू केला. हा उद्देश कोकणातील कौटुंबिक गणेशोत्सवातून पहायला मिळत आहे; परंतु अन्य ठिकाणी मात्र याचा अभाव जाणवतो.

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

गणेशोत्सवानिमित्त गावाला जाणार्‍या भाविकांना भरमसाठ दराने तिकीटविक्री होत असूनही राज्य परिवहन विभागाचे दुर्लक्ष !

उत्सवाच्या काळात खासगी बसगाड्यांनी प्रवाशांकडून भरमसाठ तिकीट आकारणे, ही जनतेची लूट आहे. अशा प्रकारची लूट वर्षांनुवर्षे चालू असतांना प्रशासन झोपले आहे का कि ही लूट त्याला मान्य आहे ?

नियमांचे उल्लंघन करणार्‍या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करू ! – माधव जगताप, पुणे महापालिका

शहरामध्ये श्री गणेशमूर्ती विक्रीची ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. त्यानुसार मूर्तीकार, उत्पादक आदींना एकत्रितपणे मूर्ती विक्रीची दुकाने थाटावी लागणार आहेत. संबंधित विक्रेत्यांनी महापालिकेकडून रितसर अनुमती घ्यावी.

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वांनी गणेशोत्सवात धर्मप्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या भाविकांना २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर कालावधीत पथकर (टोल) माफ !

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने चारचाकी वाहनाने कोकणात जाणार्‍या भाविकांना पथकराची आकारणी करू नये, तसेच भाविकांना इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पथकर नाक्यांच्या मालकांना दिला आहे.

शासनाकडून पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरणपूरक मूर्ती असलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यशासनाने गणेशोत्सवासाठी राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्‍नमंजुषा !

श्री गणेशाविषयीचे २५ प्रश्‍न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्‍नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे. ही प्रश्‍नमंजुषा मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

हिंदूंच्या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात यांविरोधात मुलुंड तहसीलदारांना निवेदन !

देशभरात हिंदूंच्या होणार्‍या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांना निवेदन देण्यात आले.