54th IFFI 2023 : चित्रपट नगरीसाठी गोवा मनोरंजन संस्था भूमी ‘लिज’वर घेणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आंचिम) होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा मनोरंजन संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

 ‘टायगर ३’ चित्रपट पहातांना प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच १० मिनिटे फटाके फोडले !

चित्रपट अभिनेत्यांचे आदर्श समोर ठेवून बेशिस्त वर्तन करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्यानेच सामाजिक मालमत्तांच्या ठिकाणीही कसे वागावे ?, याचे जनतेला ज्ञान नाही !

‘फेअरनेस क्रीम’ लावूनही मला त्याचा काहीही लाभ झाला नाही ! – अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी

‘फेअरनेस क्रीम’मुळे गोरेपणा येत असल्याचा दावा केला जातो; प्रत्यक्षात त्यातून ‘लाभ अत्यल्प आणि ग्राहकांची फसवणूकच अधिक होते’, असा अनेकांचा अनुभव आहे ! तसेच त्याचे अन्य दुष्परिणाम होतात ते वेगळेच ! त्यामुळे सरकारने अशा उत्पादनांवर स्वतःहून कारवाई केली पाहिजे !

54th IFFI 2023 : मायकेल डग्लस यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !

चित्रपट सृष्टीतील एक चमकता तारा आणि चित्रपट विश्‍वातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाणारे हॉलिवूड कलाकार मायकल डग्लस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच उत्तरदायी ! – गौरव मोरे, अभिनेता 

मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच उत्तरदायी आहेत. इतर प्रादेशिक भाषांमध्ये येणारे चित्रपट मात्र अधिक प्रसिद्ध होतात. तेथील स्थानिक कलावंतांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळते;

Parva : ‘महाभारत हा इतिहास आहे कि पौराणिक कथा’ या विषयावर ‘पर्व’ हा आगामी चित्रपट टाकणार प्रकाश !

भारताच्या वास्तविक इतिहासाचे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे. निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उचललेले हे पाऊल अभिनंदनीयच आहे !

गोवा : चित्रपटनगरीसाठी श्री भगवती पठारावरील भूमी देण्यास लोलये येथील ग्रामस्थांचा विरोध

येथील पर्यावरण, वृक्ष-वेली, पक्षी, प्राणी आणि निसर्ग स्रोत यांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध न होता येथे अनैतिकता पसरेल अन् समाजविघातक गोष्टी होतील. त्यामुळे आम्ही चित्रपटनगरीला विरोध करणार आहोत.

मराठ्यांची विजयगाथा दाखवणारा ‘बलोच’ मराठी चित्रपट सर्व शाळांत दाखवण्‍यास शासनाची अनुमती !

इतिहासात सीमेपार लढलेल्‍या मराठ्यांचे असीम धैर्य, शौर्य आणि कर्तृत्‍व यांचा रणसंग्राम असलेला ‘बलोच’ हा ऐतिहासिकदृष्‍ट्या चांगल्‍या प्रकारे मांडणीद्वारे निर्मित केलेला मराठी चित्रपट आहे.

‘जवान’ चित्रपट पहाणार्‍या प्रेेक्षकांकडून फटाके फोडून चित्रपटगृहात गोंधळ !

जिल्‍ह्यातील मालेगाव शहरातील ‘कमलदीप’ चित्रपटगृहात अभिनेते शाहरूख खान यांचा ‘जवान’ चित्रपट चालू असतांना शेवटच्‍या दृश्‍याच्‍या वेळी काही प्रेक्षकांनी फटाके फोडले.

चित्रपटसृष्‍टीचा ‘काळा’ चेहरा !

जे कलाकार, अभिनेते चित्रपटात सोज्‍वळ असल्‍याचा, आदर्श असल्‍याचा आव आणणात आणि प्रत्‍यक्षात जुगाराचे विज्ञापन करतात, त्‍यांची अन्‍वेषण यंत्रणांकडून चौकशी होते. अशांच्‍या चित्रपटांवर नागरिकांना बहिष्‍कार घालण्‍यास पुढाकार घ्‍यावा लागेल.