शेतकऱ्यांनो, विनाहंगामी शेती ही निसर्गानुकूल नव्हे !
हंगाम नसतांना आंबा-रसपुरीचे जेवण घेणे प्रतिष्ठेचे असले, तरी ते प्रकृतीला हानीकारक ठरते. प्रकृतीचा विचार न करता विनाहंगाम होणारी फळे आणि भाजीपाला यांची अधिक मागणी अन् त्याला मिळणारा बाजारभाव यांमुळे असे उत्पादन काढण्याची शेतकऱ्यांत स्पर्धाच आहे. त्याचे शेतीवर दुष्परिणाम होतात.