अमली पदार्थांची नशा !

भारतातील अमली पदार्थांची तस्करी, खरेदी, विक्री, सेवन यांवर कायमस्वरूपी चाप बसण्यासाठी काही प्रयत्न सरकार, अन्वेषण यंत्रणा, प्रसारमाध्यमे यांच्याकडून होईल, असे वाटत नाही. कारण यापूर्वीही विशेष काही झाल्याचे दिसत नाही.

चीनची आर्थिक दादागिरी !

जगातील शक्तीशाली ‘जी ७’ देशांनी एकत्र येऊन आर्थिक गट स्थापन करून चीनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही चीनच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करून चीनचे खरे स्वरूप उघड करावे, ही भारतियांची अपेक्षा आहे.

पोलीस रक्षणकर्ते ठरावेत !

‘रक्षणकर्ते’ ही ओळख जर पुन्हा मिळवायची असेल, तर पोलिसांना सर्वच स्तरांवर कसोशीने प्रयत्न करावे लागतील. दुष्कृत्ये करण्यापेक्षा सत्कृत्ये घडावीत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.

सैन्यासाठी सुसज्ज दळणवळण !

भारतीय सैन्याला बळकटी देणारी दळणवळणातील घोडदौड ही समाधानकारक तर आहेच; परंतु शत्रूराष्ट्रांवरील धडकी भरवणारी कारवाई आणखी समाधानकारक असेल, हे राष्ट्रप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाचे !

होरपळणार्‍या सीमा !

आज भारताच्या सीमा घुसखोरीच्या वणव्यात होरपळत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांची आठवण झाल्याविना रहात नाही. सावरकरांनी तेव्हाच म्हटले होते की, ज्या राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित नाहीत, ती राष्ट्रे सुरक्षित कशी असू शकतील ?

केवळ एक वर्ष !

आतंकवादाला जेथून शिक्षण मिळते त्यावर आघात केला पाहिजे. अशी कुठली विचारसरणी आहे, हे उघड करून त्याविरोधात देशात चर्चा घडवून आणली पाहिजे, हे तरी सरकारने पुढील एक वर्षांत करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे.

टोळीयुद्धे कधी थांबणार ?

‘गोळीबारासारख्या घटना न्यायालयांत वारंवार होतात; मात्र पोलीस त्यावर ठोस उपाययोजना काढत नाहीत’, असे अधिवक्त्यांचे म्हणणे आहे, जे की अत्यंत चिंताजनक आहे.