चीन आणि क्वाड !

‘क्वाड’मधील देशांनी एकत्र येऊन प्रथमत: आपापल्या देशांतील चीनच्या हस्तकांना वठणीवर आणायला हवे, तसेच संशोधन आणि सैन्य यांच्या स्तरावर संघटितपणे अन् उघडपणे चीनच्या विरोधात उभे रहायला हवे.

भारताने विश्वविजयी व्हावे !

भारताने ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी लवकरात लवकर करून चीनला सडेतोड उत्तर द्यायला हवे. तसे झाल्यासच प्रत्येक वेळी तिरकस चाल रचणार्‍या विस्तारवादी ‘ड्रॅगन’रूपी चीनला धडा शिकवता येईल.

भारतविरोधी ‘वर्णद्वेषा’चा धिक्कार !

२१ व्या शतकात एका सार्वभौम आणि सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राचा अशा स्वरूपाने होत असलेला द्वेष धिक्कारास्पद असून भारताने याच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

काळ्या जादूवर उतारा !

‘लव्ह जिहाद’साठी काळ्या जादूचा वापर होतो, हे चर्चचे म्हणणे पुरो(अधो)गामी मान्य करणार का ?

विकासातील पोकळता !

भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे ध्येय जर समोर ठेवले असेल, तर प्राथमिक टप्प्यातील सोयीसुविधांमध्ये स्वयंपूर्ण होणे याची पूर्तता करायला हवी; कारण पाया मजबूत असेल, तर जागतिक महासत्तेचा डोलारा आपण सांभाळू शकू.

हिंदूंना न्यायालयाकडून अपेक्षा !

राजकीय पातळीवरही हिंदुहिताचे नेतृत्व मिळण्यापासून हिंदू विन्मुख राहिले आहेत. अशा स्थितीत हिंदूंना एकमेव दिलासा काय तो न्यायालयीन निर्णयांद्वारेच मिळत आहे. गेल्या काही दिवसांत, तसेच काही वर्षांपूर्वीही मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय यांनी मंदिरांच्या संदर्भातील दिलेले हिंदुहिताचे निर्णय हिंदूंसाठी आशादायी आहेत.

अफगाणींना खरे साहाय्य !

पैसे आणि अन्य साहाय्य देऊन अफगाणी लोकांचे भले होईल, हा अपसमज असेल. हे साहाय्य तालिबानी गिळंकृत करतील, याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे मानवतेसाठी तालिबानला नष्ट करणेच योग्य !

सैन्याचे सक्षमीकरण !

केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजपचे शासन आल्यानंतर सैन्यदलात सकारात्मक पालट होत आहेत. खरेतर सैन्य हा कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा कणा असतो. त्याच्या सक्षमीकरणावर देशाची सुरक्षितता अवलंबून असते.