एन्.सी.बी.कडून राहिला फर्निचरवाला हिला अटक
. एन्.सी.बी.ने या प्रकरणी ४ फेब्रुवारी या दिवशी रात्री २ जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी आहे, तर दुसरी राहिला फर्निचरवाला आहे. राहिला ही अभिनेत्री दिया मिर्झा हिची साहाय्यक (असिस्टंट) होती. एन्.सी.बी.ने गेल्या मासात विविध लोकांकडून २०० किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते.