गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता !

राजस्थानमधील प्राचीन मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांच्या व्यवस्थापनाचे  अभिनंदन ! 

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात वस्रसंहिता लागू : स्कर्ट किंवा जीन्स घालण्यास बंदी !

मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्‍या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !

छत्रपती संभाजीनगर येथील २० मंदिरांत माहेश्‍वरी महिला मंडळाकडून वस्‍त्रसंहितेचे फलक !

माहेश्‍वरी महिला मंडळाने यासाठी पुढाकार घेत २० मंदिरांच्‍या दर्शनी भागात पोस्‍टर्स लावली आहेत. भाविकांनी कोणता पोशाख परिधान करावा, कोणता करू नये, याविषयी सूचना लावल्‍या आहेत.

उदयपूरमधील ऐतिहासिक आणि सर्वांत मोठ्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

देशातील एकेका मंदिराने असे करत बसण्यापेक्षा देशपातळीवरच असा निर्णय सर्व मंदिरांचे विश्‍वस्त आणि मंदिर समिती यांनी घेतला पाहिजे ! यासाठी मंदिरांचा एक देशव्यापी महासंघच स्थापन करण्याची आवश्यकता आहे !

मंदिरात वस्‍त्रसंहिता आवश्‍यकच !

शासन धार्मिक स्‍थळे, मंदिरे, गडदुर्ग यांच्‍या विकासासाठी निधी उपलब्‍ध करून देत असते. त्‍यासाठी त्‍यांना पर्यटनस्‍थळाचा दर्जा देत असते. अशांना धार्मिक स्‍थळांचा दर्जा देऊन विकास अवश्‍य करावा.

अकोला येथील श्री राजराजेश्‍वर आणि श्री विठ्ठल मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्रातील सर्वत्रच्या मंदिर विश्‍वस्तांनी याचा आदर्श घ्यावा !

मंदिरांमध्ये प्रवेश करतांना संस्कृतीनुसार वस्त्रे परिधान करायला हवीत ! – डिगंबर महाले, अध्यक्ष, श्री मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर (जिल्हा जळगाव)

वस्त्रसंहिता प्रथम मंगळग्रह मंदिरामध्ये लागू करण्यात आली. काही जणांनी विरोध केला; मात्र भाविकांनी वस्त्रसंहितेचे समर्थन केले. मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून येणार्‍यांना आम्ही नम्रपणे पूर्ण वस्त्रे देतो आणि तेच परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करतो. असे उद्गार त्यांनी काढले

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

वस्‍त्रसंहितेविषयी विचार करून निर्णय घेतला जाईल ! – सप्‍तशृंगी गड मंदिर संस्‍थान

सर्व शासकीय देवस्‍थानांत वस्‍त्रसंहितेविषयी जो काही निर्णय घेतला जाईल, त्‍याचा विचार करून योग्‍य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे संस्‍थानच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.