वस्‍त्रसंहितेविषयी विचार करून निर्णय घेतला जाईल ! – सप्‍तशृंगी गड मंदिर संस्‍थान

वस्‍त्रसंहितेविषयी वणी (जिल्‍हा नाशिक) सप्‍तशृंगी देवस्‍थानची भूमिका !

नाशिक – वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयी साडेतीन शक्‍तिपीठांपैकी आद्यपीठ अशी महती असलेल्‍या जिल्‍ह्यातील वणी येथील सप्‍तशृंगी गड देवस्‍थानने वस्‍त्रसंहितेविषयी भूमिका घेतांना म्‍हटले आहे की, यातील इतर सर्व शासकीय देवस्‍थानांत वस्‍त्रसंहितेविषयी जो काही निर्णय घेतला जाईल, त्‍याचा विचार करून योग्‍य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे संस्‍थानच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयी सप्‍तशृंगीगड ग्रामपंचायतीने २९ मेच्‍या मासिक बैठकीत केलेल्‍या ठरावावरही या बैठकीत चर्चा झाली. दर्शनासाठी येतांना महिलांसमवेत पुरुषांनी पूर्ण पेहराव परिधान करावा, असे या ठरावात नमूद करण्‍यात आले होते. १६ जून या दिवशी मात्र सप्‍तशृंगी गड मंदिर संस्‍थानचे नवनियुक्‍त अध्‍यक्ष अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश बी.व्‍ही. वाघ यांच्‍या उपस्‍थितीत मंदिराच्‍या विश्‍वस्‍तांची बैठक शहरातील द्वारका परिसरात असलेल्‍या संस्‍थानच्‍या कार्यालयात सायंकाळी पार पडली, त्‍यात वरील निर्णय घेण्‍यात आला.