ज्ञानवापीचा खटला पुढेही चालू रहाणार !
वाराणसी जिल्हा न्यायालयाचा हिंदूंच्या बाजूने निर्णय !
निर्णयाला मुसलमान पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार
वाराणसी जिल्हा न्यायालयाचा हिंदूंच्या बाजूने निर्णय !
निर्णयाला मुसलमान पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार
हिंदूंना त्यांच्या हक्काची धार्मिक स्थळे मिळू नयेत, यासाठी मुसलमान कशा प्रकारे दावा करत आहेत, हेच यातून दिसून येते ! ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’च्या घोषणा देणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी याच खटल्यातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांनाही ठार मारण्याची धमकी आलेली आहे.
ज्ञानवापी आणि तेथील शृंगार गौरी प्रकरणातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानमधील संपर्क क्रमांकावरून आलेल्या दूरभाषद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पणती राजश्री चौधरी यांना पोलिसांनी येथे नजरबंद केले आहे. त्या श्रावणी सोमवारनिमित्त वाराणसी येथे जाऊन ज्ञानवापीमध्ये शृंगारगौरी येथे जलाभिषेक करणार होत्या. त्यांना प्रयागराज रेल्वे स्थानकावरून कह्यात घेण्यात आले.
ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्ञानवापीमधील सर्वेक्षणाच्या वेळी अभयनाथ यादव यांनी न्यायालयाच्या आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मागणारी आणि त्याची ‘कार्बन डेटिंग’ चाचणी करण्याची मागणी करणार्या नवीन याचिकेवर सध्या सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार मिळण्यासाठी श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती दलाचे अध्यक्ष राजेश मणी त्रिपाठी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. श्रावण मास चालू होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.
आता सरकारनेही याविषयीचे पुरावे जनतेसमोर आणून मंदिर पुन्हा बांधण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !