ज्ञानवापीमध्ये पूजेची अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे !

काशी धर्म परिषदेत साधू-संतांची मागणी

काशी धर्म परिषद – . . . तर मुसलमानांना तेथे जाण्यास प्रतिबंध करावा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे ३ जून या दिवशी आयोजित काशी धर्म परिषदेच्या बैठकीत साधू आणि संत यांनी एकूण २२ ठराव संमत केले. या वेळी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.

या बैठकीत पातालपुरी मठाचे महंत स्वामी बालक दास यांनी सांगितले की, आम्ही मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी सनातन धर्माच्या प्रमुख श्रद्धा केंद्रांवरील त्यांचा दावा सोडावा.

साधू आणि संत यांनी संमत केलेले काही प्रमुख ठराव !

१. ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्याची आणि त्याची पूजा करण्याची अनुमती देण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ही अनुमती दिली जाणार नसेल, तर मुसलमानांना तेथे जाण्यास प्रतिबंध करावा.

२. ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’ रहित करण्यात यावा, शिवलिंगाला कारंजे म्हणणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा.

३. या बैठकीत मक्का आणि मदिना येथील इमामांना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) पत्र पाठवून औरंगजेबाने काशी येथील मंदिरांच्या केलेल्या विध्वंसाविषयीचा इतिहास सांगावा.