गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. काबुलपासून थेट कॅस्पियन समुद्रापर्यंत भारतीय संस्कृती पसरली असल्याने त्या ठिकाणी हिंदु मंदिरांचे अस्तित्व स्वाभाविक आहे. हिंदु देवतांमध्ये शिव आणि श्री गणेश यांचे स्थान उच्च असल्यामुळे या दोन देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जगातील ६६ देशांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात श्री गणेश मंदिरे आणि त्यातील श्री गणेशमूर्ती विद्यमान आहेत.