आयोग सिद्ध केला असता, तर अन्य मागासवर्गियांचे आरक्षण पुनर्स्थापित करता आले असते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

अन्य मागासवर्गियांच्या आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते. मोर्चे काढण्याऐवजी या खटल्यात लक्ष घातले असते, तर आरक्षण टिकवता आले असते.

पदोन्नतीतील आरक्षणावर तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची पदोन्नती आरक्षणाच्या सूत्रावरून वेगवेगळी भूमिका दिसून येत आहे. सरकारची भूमिका नेहमीच दुटप्पीपणाची राहिली आहे.

नागपूर येथे बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’द्वारे साहाय्य करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. या वेळी त्यांनी काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिसच्या) स्थितीचा आढावाही घेतला.

शासनाने पीडितांना तातडीने भरघोस हानीभरपाई द्यावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी शासनाने काही घोषणा केल्या होत्या; मात्र त्याची हानीभरपाई अद्याप मिळालेली नाही. आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. शासनाने पीडितांना तातडीने हानीभरपाई द्यायला हवी, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …..

आधुनिक वैद्यांअभावी अकोला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बंद; चालू करण्यासाठी प्रयत्न चालू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालया’ला भेट देऊन पहाणी केली.

आरोप-प्रत्यारोप करून सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर खापर फोडले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्र शासनाने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रहित झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात आरक्षण रहित झाल्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप चालू झाले असून ………

घोटाळेबाजांना शिक्षा कधी ?

लक्षावधी भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपये, दागिने, भूमी यांवर डल्ला मारणार्‍यांना अभय देण्यात आले आहे का ? अशीच शंका भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे !

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू !

आरोग्यक्षेत्राच्या व्यवस्थापनाचे धिंडवडे काढणारी घटना ! एकीकडे ऑक्सिजनअभावी, तर दुसरीकडे उपलब्ध ऑक्सिजनच्या गळतीमुळे नागरिकांचा मृत्यू होणे, यापेक्षा आरोग्ययंत्रणेला लज्जास्पद दुसरे काय असू शकते ? या घटनेस उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार !

पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव टाकणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे या कारणांवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा….

निर्बंध लावल्याने किती लाभ होतो, याचा सरकारने विचार करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक आव्हानात्मक होत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारला काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निर्बंध लावत असतांना सध्या जे निर्बंध कार्यवाहीत आहेत, त्यांचा कितपत लाभ होत आहे, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे.