हिंदुत्वाला वाचवण्यासाठी राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवून राष्ट्रातील जनतेने जागे राहिले पाहिजे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हिंदुत्वाला वाचवायचे असेल, तर राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवून संपूर्ण राष्ट्रातील जनतेने जागे राहिले पाहिजे, असे विधान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली येथे केले.

डोकलाममध्ये भारताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत धोरण अवलंबले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

“VEER SAVARKAR THE MAN WHO COULD HAVE PREVENTED PARTITION” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अधिवेशनाला सामोरे जाण्यास सरकारची सिद्धता नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

२९ नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

समर्पित भावनेने हिंदुत्वाचे कार्य करणारे मुंबईतील कर्मयोगी आनंदशंकर पंड्या यांना हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

एका व्यक्तीने संकल्प केला, तर ती काय करू शकते ? याचे आनंदशंकर पंड्या हे उत्तम उदाहरण ! शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जागृत ठेवण्यासाठी झटणारे हे व्यक्तीमत्व होते !

सीमा भागातील कन्नडसक्ती दूर करा !

बेळगाव येथील नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत. १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या हिंसाचाराविषयी सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ?, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणासाठी पर्याय सुचवला आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाचे प्रकरण

मालेगावची घटना म्हणजे देशात अराजक निर्माण करण्यासाठी विचारपूर्वक केलेला प्रयोग ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

. . . हे षड्यंत्र उघड होऊ नये, यासाठी नवाब मलिक यांनी हे प्रकरण भाजपवर ढकलले. या घटनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, असे आरोप फडणवीस यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला ‘बांधकाम कामगार मंडळा’चे अध्यक्ष केले. असे आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले.