सीमा भागातील कन्नडसक्ती दूर करा !

बेळगाव येथील नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

डावीकडून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, देवेंद्र फडणवीस, नगरसेवक रवी साळुंखे आणि समीत कदम (उजवीकडे)

गोवा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागतात. पोलिसांकडून मराठी भाषिकांवर दडपशाही केली जात आहे. त्यामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारला सांगून कन्नडसक्ती दूर करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बेळगाव येथील नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. गोवा येथे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या फडणवीस यांची साळुंखे यांनी भेट घेतली आणि त्यांना हे निवेदन दिले. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र येथील जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम, अनंत टपाले उपस्थित होते.