चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात

चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !

नवी देहली – चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे ड्रोन्स बनवले आहेत. ‘सी विंग ग्लायडर्स’ अशा नावाने हे ड्रोन ओळखले जातात. हे मानवविरहित असतात. याद्वारे समुद्रामध्ये हेरगिरी केली जाते; मात्र चीनने दावा केला आहे की, आम्ही याच्या माध्यमातून समुद्रातील माहिती गोळा करत आहोत.