राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील जनगणना पुढे ढकलली

केंद्रीय गृह खात्याचा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

नवी देहली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता एप्रिल मासापासून चालू होणार्‍या वर्ष २०२१ राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एन्.पी.आर्.) प्रक्रियेचा पहिला टप्पा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. देशभरात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘जनगणना (२०२१)’ची प्रक्रिया चालू रहाणार आहे; पण ती प्रक्रिया कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलली आहे.