पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह भाजपमध्ये करणार प्रवेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे १९ सप्टेंबर या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी नुकताच स्थापन केलेला राजकीय पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’चे प्रवक्ते प्रीतपाल सिंह बालियावाल यांनी केली.

गौतम अदानी जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती !

‘फोर्ब्स’ या जागतिक आर्थिक संस्थेनुसार भारताचे अब्जाधीश व्यावसायिक गौतम अदानी हे आता जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनली आहे. अमेरिकेचे इलॉन मस्क यांच्यानंतर सर्वाधिक मालमत्ता अदानी यांची आहे.

उच्च जातींतील गरिबांना आरक्षण का दिले जाऊ शकत नाही ? -सर्वोच्च न्यायालय

उच्च जातींतील गरिबांसाठी आरक्षणाच्या व्यवस्थेच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या वेळी ‘उच्च जातींतील गरिबांना आरक्षण का नको ?’, असा प्रश्‍न न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांना विचारला.

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये समान गणवेश लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना एकसमान गणवेश लागू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने यावर विचार करण्यासच नकार दिला.

पतंजलीची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र ! – योगऋषी रामदेव बाबा

आतापर्यंत पतंजलीने ५ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची संधी दिली आहे. तरीदेखील पतंजलिविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. सरकारी नियमानुसार, पतंजलि आस्थापन विविध उत्पादनांची निर्मिती करते. तरीदेखील अनेक क्षेत्रांतील माफीया पतंजलीला संपवण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत.

भारताचे आखाती देशांच्या संबंधांमुळे पाकला किंमत चुकवावी लागू नये !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर पहिल्यांदा सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेले आहेत. एस्. जयशंकर यांनी सौदीचे महंमद बिन सलमान यांची जेद्दाह येथे भेट घेतली.

देहली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावर मार्गदर्शन

ग्रेटर कैलाश येथे असलेल्या ‘मालाकुमार इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ आस्थापनातील २५ कर्मचार्‍यांनी घेतला.

डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्‍वर मंदिरात देहत्याग केला.

हलाल अर्थव्यवस्था आपल्यावर लादली जात आहे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, केंद्रशासनाचे अधिवक्ता

देहली येथे ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन !