देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये समान गणवेश लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी देहली – देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना एकसमान गणवेश लागू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने यावर विचार करण्यासच नकार दिला. निखिल उपाध्याय यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. त्यांनी या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश देण्याची मागणी केली होती.