गौतम अदानी जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती !

नवी देहली – ‘फोर्ब्स’ या जागतिक आर्थिक संस्थेनुसार भारताचे अब्जाधीश व्यावसायिक गौतम अदानी हे आता जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनली आहे. अमेरिकेचे इलॉन मस्क यांच्यानंतर सर्वाधिक मालमत्ता अदानी यांची आहे. मस्क यांची २७३.५ अब्ज डॉलर्स (२१ लाख ८० सहस्र कोटी रुपयांहून अधिक) मालमत्ता असून अदानी यांच्याकडे १५५.७ अब्ज डॉलर्स (१२ लाख ४१ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) असल्याचे फोर्ब्सने सांगितले. अदानी यांनी फ्रान्सचे अब्जाधीश बरनार्ड आरनॉल्ट आणि अमेरिकेतील अ‍ॅमेझॉनचे माजी प्रमुख जेफ बेजॉस यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.