गुरुवर्य ह.भ.प. नामदेव आप्पा शामगावकर यांचा देहत्याग !

महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त शामगाव, तालुका कराड येथे १३ ते २६ डिसेंबर या कालावधीत ‘अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या २ सैनिकांमध्ये वाद गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू

जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन

ज्या योद्धयांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मोठ्या नेत्यांनी केला नाही. आपले लोक ब्रिटिशांविरुद्ध लढत आहेत, हे पाहूनही त्यांनी वाचवले नाही- विक्रम गोखले

सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांना मातृशोक !

त्यांच्या पश्चात् २ मुले, २ सुना, १ मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गडकरी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे निधन

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मामेभाऊ तथा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील विजय (नाना) वर्तक यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता नागोठणे येथील त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

गोवा : विद्याप्रबोधिनी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा हिंदुत्वनिष्ठ राजकुमार देसाई यांचे निधन

राजकुमार देसाई हे गोमंतक मंदिर महासंघाचे एक सदस्य होते, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातही ते सक्रीय सहभाग घेत असत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

मोरबी (गुजरात) येथे झुलता पूल कोसळून १० जणांचा मृत्यू

आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच हा पुलाचे नूतनीकरण करून लोकांसाठी पुन्हा उघडण्यात आला होता.

इन्सुली (तालुका सावंतवाडी) येथील सनातनचे साधक तथा निवृत्त गटविकास अधिकारी जयदेव नाणोसकर यांचे निधन

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील सनातनचे साधक तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे निवृत्त गटविकास अधिकारी जयदेव सोमा नाणोसकर (वय ८४ वर्षे, मूळ गाव नाणोस, तालुका सावंतवाडी) यांचे २९ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता इन्सुली येथील रहात्या घरी निधन झाले.

देशभक्त आणि आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन करणार्‍या ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन !

ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी (वय ९५ वर्षे) यांचे २७ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १ वाजता तुळशीबागवाले कॉलनीतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने पुणे येथे निधन !

मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. निम्हण हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे आमदार होते.