कराड, १५ डिसेंबर (वार्ता.) – वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे शामगाव, तालुका कराड येथील प्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प. नामदेव आप्पा शामगावकर यांचे मंगळवार, १३ डिसेंबर या दिवशी वैकुंठगमन झाले. अभंगाचे निरुपण असो अथवा पारायणातील कीर्तन-प्रवचन आपल्या रांगड्या भाषेत गेल्या ६५ वर्षांपासून महाराष्ट्रातील खेडोपाड्यांसह परराज्यातही कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवण्यामध्ये महाराजांचे मोठे योगदान आहे. एका गावात पारायणाच्या ठिकाणी मेणबत्तीने आरती करणार्यांना हे भारतीय संस्कृतीत बसत नाही, असे खडसावून हिंदु संस्कृतीचे आचरण करण्यास सांगणारे संत होते.
(सौजन्य : Suresh Maharaj Sul)
महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त शामगाव, तालुका कराड येथे १३ ते २६ डिसेंबर या कालावधीत ‘अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ ते ११ या कालावधीत गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.