मोरबी (गुजरात) येथे झुलता पूल कोसळून १० जणांचा मृत्यू

पुलावर होते ५०० लोक !

मोरबी (गुजरात) – येथे मच्छु नदीवर असलेला झुलता पूल (केबल ब्रिज) कोसळला. त्या वेळी या पुलावर ५०० हून अधिक लोक होते. आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच हा पुलाचे नूतनीकरण करून लोकांसाठी पुन्हा उघडण्यात आला होता.