गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यात असलेल्या गिरनार पर्वतावर स्थित श्री दत्त मंदिराची सनातनच्या एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

गिरनार पर्वतावरील गिरनार दत्त मंदिर गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यात आहे. गिरनार पर्वताच्या शिखरावर हे मंदिर आहे. भगवान दत्तात्रेयांनी गिरनार पर्वतावर १२ सहस्र वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्या वेळी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून पूर्णतः साधनेत विलीन होऊन परमज्ञान प्राप्त केले. दत्तात्रेयांनी गिरनार पर्वतावर योग, ध्यान आणि तप करून जीवनाच्या परमसत्याचा शोध घेतला. त्यांच्या तपश्चर्येच्या वेळी पशू, पक्षी आणि वन्यजीव त्यांच्या नजीक येऊन शांत रहात असत. त्यांची साधना निसर्ग आणि माणूस यांच्यातील अद्वैत दर्शवते. तपश्चर्येच्या कालावधीत अनेकदा मोह, काम, क्रोध आणि अहंकार या मनातील विकारांनी दत्तात्रेयांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला; मात्र दत्तात्रेयांनी स्वतःच्या साधनेने या सर्व विकारांवर विजय मिळवला आणि भक्तांसाठी एक आदर्श निर्माण केला. भगवान दत्तात्रेयांच्या सान्निध्यात येणारे ऋषी, साधू आणि भक्त यांना त्यांनी मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवला. तपश्चर्या करतांना भगवान दत्तात्रेयांनी निसर्गातील २४ गुरूंपासून शिकलेले ज्ञान लोकांना दिले. त्यांच्या अनुभवांनी मानवी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीतून शिकण्याचा संदेश दिला. गिरनार पर्वत आजही सहस्रो भक्तांसाठी तप, ध्यान, आणि मोक्षप्राप्ती यांचे प्रतीक आहे.

गिरनार पर्वत

गिरनार पर्वतावर स्थित श्री दत्त मंदिराचे छायाचित्र पाहून त्याची सनातनच्या एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सनातनचे एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण


सारणीतील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण

सनातनचे काही सद्गुरु, संत आणि साधक सूक्ष्मातील ज्ञान मिळवतात. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. साधक, संत आणि सद्गुरु या क्रमानुसार त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे साधक, संत आणि सद्गुरु यांनी शोधून काढलेल्या एखाद्या सूक्ष्मातील स्पंदनांच्या टक्केवारीत भेद असू शकतो.

१ अ. ब्रह्मतत्त्व

१ अ १. ब्रह्मतत्त्वाचे वलय श्री दत्तमंदिरात कार्यरत असणे : श्री दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मतत्त्व असल्याने मंदिरात ब्रह्मतत्त्वाचे वलय कार्यरत आहे.

१ आ. शिवतत्त्व

१ आ १. शिवतत्त्वाचे वलय मंदिरात कार्यरत असणे

श्री दत्तात्रेयांमध्ये शिवतत्त्व असल्याने मंदिरात शिवतत्त्वाचे वलय कार्यरत आहे.

१ इ. दत्ततत्त्व

१ इ १. दत्ततत्त्वाचे वलय मंदिरात कार्यरत असणे : फार प्राचीन काळापासून भगवान दत्तात्रेयांचे सूक्ष्मातून गिरनार पर्वतावर अस्तित्व आहे. गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या आणि ध्यान केले. दत्तात्रेय ध्यानावस्थेत असतांना ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांच्या अनुसंधानात असत. दत्तात्रेयांनी केलेल्या तपश्चर्येमुळे त्यांच्यात ब्रह्मा, विष्णु आणि शिव ही तीन तत्त्वे विलीन (एकरूप) झाली अन् ते (भगवान दत्तात्रेय) द्वैतातून अद्वैतात गेले.

१ इ २. दत्ततत्त्वाचे कणरूपी किरण मंदिरातून प्रकाशमान आणि व्यापक स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होत असणे.

१ ई. विष्णुतत्त्व

१ ई १. विष्णुतत्त्वाच्या लहरी पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे गिरनार पर्वताच्या टोकापासून ते पायथ्यापर्यंत प्रवाहित होत असणे.

१ उ. शक्ती

१ उ १. शक्तीचे वलय मंदिरात कार्यरत असणे : मंदिरात भगवान दत्तात्रेयांचे सूक्ष्मातून अस्तित्व असल्याने शक्तीचे वलय मंदिरात कार्यरत आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भक्तांना मंदिरात त्यांचे अस्तित्व जाणवते आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात.

१ ऊ. चैतन्य

१ ऊ १. चैतन्याचे वलय मंदिराच्या भोवती प्रकाशमान स्वरूपात कार्यरत असणे.

१ ऊ २. चैतन्याचे वलय मंदिरातून प्रकाशमान आणि व्यापक स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होत असणे.

२. दत्त मंदिराविषयी जाणवलेली अन्य सूत्रे

अ. गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रेयांचे मंदिर असल्याने हा पर्वत सात्त्विक बनला आहे. गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केली आहे. त्यामुळे हा पर्वतही स्वतःला भाग्यवान समजतो.

आ. बर्‍याच वर्षांपूर्वी भगवान दत्तात्रेयांसमवेत विविध देवतांचे अस्तित्व या पर्वतावर होते. या सर्व देवता एकमेकांच्या अनुसंधानात असत.

इ. गिरनार पर्वतावर असतांना भगवान दत्तात्रेयांना ईश्वरी ज्ञान प्राप्त झाले.

ई. उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या एका संतांनी या पर्वतावर राहून घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या करून ते (संत) भगवान दत्तात्रेयांशी एकरूप झाले आणि त्यांना मोक्षप्राप्ती झाली.’ (‘एका संदर्भानुसार नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली असून दत्तमहाराजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन कृपांकित केले.’ – संकलक)

– सनातनचे एक संत (२०.११.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक