बांधकाम व्यावसायिकाला ग्राहकांवर एकतर्फी करार लादता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

घर घेणार्‍यांवर बांधकाम व्यावसायिक एकतर्फी करार लादू शकत नाही. ‘ग्राहकाला वेळेवर घर न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाला टाळाटाळ न करता खरेदीदाराला पूर्ण रक्कम ९ टक्के व्याजासह परत करावी लागेल’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

इंडियन ऑईल आस्थापन ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच पोचवणार

सरकारी आस्थापन इंडियन ऑईलने आता तात्काळ सेवा देण्याची योजना बनवली आहे. यानुसार ग्रहकांनी मागणी केल्यानंतर केवळ ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच देण्यात येणार आहे; मात्र यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाला रिझर्व्ह बँकेकडून अडीच कोटी रुपयांचा दंड

नॉन बँकिंग वित्तीय सेवा देणार्‍या बजाज फायनान्स आस्थापनाला NBFC प्रॅक्टिस कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपये दंड आकारला आहे.

केवळ धूळफेक !

उंच इमारतीवरून किंवा कड्यावरून उड्या मारण्याची शक्ती मिळत असल्याचे दाखवणारे एखादे शीतपेय किंवा एक कापड फिरवल्यावर फरशी चकाचक चमकत असल्याचे दाखवणारे एखादे स्वच्छतेचे रसायन असो ! उत्पादनाचे अवास्तव ‘मार्केटिंग’ करण्याचा हा प्रकार कोरोनोच्या काळात अजून वाढलेला दिसून येत आहे.