पुणे येथील ‘राजीव गांधी प्राणीसंग्रहालया’च्या संचालकांवर गुन्हा नोंद ! 

कात्रज येथील ‘राजीव गांधी प्राणीसंग्रहालया’चे संचालक राजकुमार जाधव यांच्याविरुद्ध वन्य प्राण्यांचे चुकीचे व्यवस्थापन केल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई वन विभागाकडून केली आहे;

वीजचोरी करणार्‍या ८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंद ! 

डोंबिवलीजवळील खोणी गावात वीजचोरी पडताळणीसाठी गेलेल्या महावितरणच्या विशेष पथकावर ग्रामस्थांनी आक्रमण केले होते. त्यात कर्मचार्‍यांसह पोलीसही गंभीररित्या घायाळ झाले.

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांवर गुन्हा नोंद होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू ! – वैभव खेडेकर, मनसे राज्य सरचिटणीस

पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी अनुक्रमे ‘सनातन धर्म हा रोग आहे’, ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’, अशी प्रक्षोभक विधाने केली आहेत.

मुंबईत साहाय्यक पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा नोंद !

जनतेच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांवरच असे आरोप होणे गंभीर आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !

४ वर्षांनंतर पसार आरोपींना अटक करून १३ लाख रुपयांचे सोने शासनाधीन !

स्‍थानिक स्‍तरावरील गुन्‍हेगार वर्षानुवर्षे पसार असणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?

जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्ननिष्ठांची पोलिसांकडे मागणी

‘आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी त्वरित गुन्हे नोंदवावेत’, अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाहीत ?

१४ ऑक्टोबरपासून मुंबईतील सर्व टोलनाक्यांवर कॅमेरे लावणार ! – राज ठाकरे

राष्ट्रीय महामार्गावर रस्ते खराब असतील, तर त्या ठिकाणचा टोल रहित करण्याविषयी राज्य सरकार येत्या १५ दिवसांत केंद्र सरकारशी चर्चा करेल.

सामाजिक माध्यम ‘एक्स’कडून (पूर्वीच्या ट्विटरकडून) हमासशी संबंधित शेकडो खाती बंद !

‘आतंकवादी संघटना आणि फुटिरतावादी यांच्यासाठी ‘एक्स’वर कोणतेही स्थान नाही’, असे एक्सकडून स्पष्ट करण्यात आले.

गोवा : कळंगुट पोलिसांची अनधिकृत दलालांवर कारवाई 

अनेक वेळा अनधिकृत दलालांवर कारवाई होऊनही हे प्रकार का थांबत नाहीत, याचा प्रशासनाने शोध घ्यावा ! पकडलेले दलाल दंड भरून सुटका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार करत असावेत. यामुळे त्यांना धाक बसेल अशी शिक्षा केली पाहिजे !

ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला टाळे !

सीमा सुरक्षा दलातील अधिकारी आणि सैनिक यांनीही ज्ञानोबा सोसायटीमध्‍ये २ कोटी रुपये गुंतवले होते.