महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर आक्रमण

उल्हासनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांचे निकटवर्तीय असलेले महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने जीवघेणे आक्रमण केल्याची घटना १७ एप्रिल या दिवशी सायंकाळी उल्हासनगर येथे घडली आहे.

यात माखीजा घायाळ झाले असून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. ते ‘कॅम्प ४’ मधील दहा चाळ रोड सेंट्रल पार्क हॉटेल जवळील रस्त्याची पहाणी करत होते. त्या वेळी हॉटेलमध्ये बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर अंदाधुंद दगडफेक केली. त्याला माखीजा यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडण्यात आली.