प्रश्न : आज शहरांतून गोपालन कसे शक्य आहे ?
उत्तर : कॉलनी बांधतांनाच कोपर्यात गाईचा गोठा ठेवता येईल. गाय सांभाळणार्याला तिथे भाड्याने जागा देता येईल. जागेचा प्रश्न तर सहज सोडवता येईल. शहरात मैदाने आहेत. क्रिकेट इत्यादी खेळांकरता मोठी मैदाने आहेत. तिथे दहा पाच कॉलनीच्या गोशाळेची व्यवस्था होईल.
गाईचा चारा, पाणी, औषधी चिकित्सा, गोर्ह्याची व्यवस्था, तज्ञाचा समादेश, पशूवैद्य अशी सर्व व्यवस्था करणे सुकर होईल. प्रत्येक कॉलनीत एक वॉचमन असतो. त्याकरता शेड असतेच. तशीच तिथे शेड बांधून गाईची व्यवस्था का करता येणार नाही ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’ जानेवारी २०११)