प्रत्येक घरी निदान एका गायीचे पालन करणे, ते शक्य नसल्यास गोशाळेतील एखाद्या गायीच्या पालन-पोषणाचा व्यय करणे
पंचगव्यापासून निर्माण झालेले स्वास्थ्यवर्धक लाभदायी असे दंतमंजन, साबण, उटणे, धूप, मच्छर निरोधक उदबत्ती अशा उत्पादनांचा नित्य वापर करणे
घरामध्ये गायीचेच दूध, दही, ताक आणि तूप यांचा वापर करणे
घरामध्ये आजारपणाच्या काळात स्वस्त, सुलभ आणि दोष निर्माण न करणार्या पंचगव्य औषधींचा उपयोग केला जाणे
लक्षावधी गोवंशाच्या मृत्यूचे कारण बनत असलेल्या प्लास्टिक पिशव्या न वापरणे
गोवंश हत्या करून निर्माण होत असलेली उत्पादने समजून घेऊन त्यांच्या वापराच्या विरोधात जनजागरण करणे, उदा. चामड्यापासून बनवलेल्या चपला, बूट, कोट, पर्स, सुटकेस, पट्टे, गालीचे, फर्निचर कव्हर्स, क्रिकेट बॉल, फूटबॉल, कलात्मक मूर्ती, गोमांस आणि चरबीपासून निर्माण केलेले तूप, आईस्क्रीम, चॉकलेट, टूथपेस्ट आणि पावडर, काही साबण, कोल्ड क्रीम, लिपस्टीक, परफ्यूम, नेलपॉलिश, शाम्पू, सिंथेटिक दूध इत्यादी
गोहत्या करून निर्माण होत असलेली औषधे, उदा. इन्शुलिन, डेक्सोरेंज सिरप, विविध कॅल्शिअम पूरक औषधींच्या वापरास विरोध करणे (औषध साहित्यात Bovine लिहिलेली सर्व औषधे गोवंशाच्या मांसापासून सिद्ध होत असतात, हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे.)
सेंद्रिय खत वापरून निर्माण केल्या गेलेल्या खाद्यांन्नांचाच वापर करणे
संकटात सापडलेल्या आणि कत्तलखान्याकडे जात असलेल्या गोवंशाला वाचवण्यासाठी शक्यतो साहाय्य करणे’
(विश्व हिंदु परिषदेची दिनदर्शिका – २०१०)