बायथाखोल, बोरी येथे लाखो रुपयांचे अनधिकृत गोमांस कह्यात !

गोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ?

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांस आयात !  हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान

बायथाखोल, बोरी येथे अनधिकृतपणे गोमांसाची वाहतूक करणार्‍यांवर धाड टाकण्यात आली, यावर बोलतांना गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले, ‘‘बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बेळगाव येथून गोव्यात गोमांसाची आयात केली जात आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून आतंकवाद्यांना वित्तपुरवठा ! – मिलिंद एकबोटे

जिल्ह्यातील फलटण येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून भारतातील आतंकवाद्यांना वित्तपुरवठा केला जातो. नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्राचे पशूधन संपवणारे हे पशूवधगृह तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

कर्जत (अहिल्‍यानगर) येथे केलेल्‍या कारवाईत ४ गोवंशियांची सुटका !

बहुतांश वेळा गोरक्षकांनाच अवैध गोवंशियांची माहिती कशी मिळते ? याचा अभ्‍यास पोलीस करतील का ?

प्राणी कल्याण अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍या गुन्हेगारांना पोलिसांकडून विशेष वागणूक ! 

कत्तलीसाठी जाणार्‍या गायींची वाहतूक करणारे वाहन अडवल्याने प्राणी कल्याण अधिकारी (गोरक्षक) आशिष बारीक यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार १२ ऑगस्टला घडला होता.

विमाननगर (पुणे) येथे ३ गायींची कत्तलीपासून सुटका !

वाहनचालकास गायींविषयी विचारणा केली असता या गायी ‘कँप’ येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे, असे सांगितले. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

बिहारमध्ये गोतस्करांना पकडणार्‍या गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला जातो ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्‍या ठिकाणी चालू करण्यात येते.

अहिल्‍यानगर येथे ३ गोरक्षकांवर धर्मांध गोतस्‍करांचे प्राणघातक आक्रमण !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे, गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्‍करीच्‍या समस्‍येची भीषणता लक्षात येते.

गोरक्षकांच्‍या वतीने पुणे पोलिसांना निवेदन !

गोवंश हत्‍याबंदी कायदा राज्‍यात लागू असूनही गोतस्‍करांना त्‍याचा धाक नाही, हेसुद्धा लक्षात येते. गोवंशियांसाठी सुरक्षित वातावरण पोलीस राज्‍यात कधी निर्माण करणार ?

नेवासा (अहिल्‍यानगर) येथे गोरक्षकांच्‍या सतर्कतेमुळे ४ म्‍हशींना कत्तलीपासून जीवनदान !

ऋषिकेश भागवत यांनी नेवासा पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक डोईफोडे यांना याविषयी माहिती कळवताच पोलिसांच्‍या साहाय्‍याने वाहनचालकाला कह्यात घेऊन त्‍याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.