अवैध पशूवधगृहावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ धर्मांधांचे संतापजनक कृत्य !
अहिल्यानगर – येथील काही भागांत मोठी अवैध पशूवधगृहे चालू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमांसाची तस्करी केली जाते. याविषयी माहिती मिळताच गोरक्षक अविनाश सरोदे आणि अन्य गोरक्षक यांनी पोलिसांच्या साहाय्याने यावर कारवाई केली. ३ ऑगस्टला रात्री ११ वाजता कारवाई करून घरी जात असतांना येथील चांदणी चौक परिसरात गोरक्षक अविनाश सरोदे यांच्यासह अन्य दोघांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. कारवाईनंतर कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात निहाल कुरेशी याने गोरक्षकांना मारण्याची धमकी दिली होती. अविनाश सरोदे यांची स्थिती गंभीर आहे. शासकीय रुग्णालयात तिन्ही गोरक्षकांवर उपचार चालू आहेत. या प्रकरणी वहाब कुरेशी, वाहिद कुरेशी, निहाल कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे; पण पोलिसांनी अजूनही त्यांना अटक केली नाही. (गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे, हे लज्जास्पद आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाराज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे, गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते. गोवंशहत्या बंदी कायदा करून अनेक वर्षे झाली आहेत, तरी सरकार गोहत्या, गोतस्करी आणि अवैध पशूवधगृहांवर प्रतिबंध कधी लावणार आहे ? |