|
फोंडा – अनधिकृत गोमांसाच्या वाहतुकीच्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी फेैझल बेपारी, अफझल बेपारी आणि रिहास बेपारी (मूळचे कर्नाटक येथील आणि सध्या सासष्टी येथे रहाणारे) यांना कह्यात घेतले आहे. आरोग्यास अपायकारक गोमांसाची वाहतूक करणे आणि अधिकृत प्रमाणपत्राविना गोमांसाची वाहतूक करणे यावरून संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
आरडीएक्सगोवा गोवा न्यूज
फोंडा (गोवा), २७ ऑगस्ट (वार्ता.) – बजरंग दलाचे बोरी, फोंडा येथील कार्यकर्ते आणि गोरक्षक यांच्या तक्रारीनंतर फोंडा पोलिसांनी बायथाखोल, बोरी येथे एका वाहनातून दिवसाढवळ्या नेण्यात येत असलेले लाखो रुपये किमतीचे अनधिकृत गोमांस कह्यात घेतले. या वाहनामध्ये सुमारे ६ गोवंशियांची डोकी आणि गोमांस होते.
बजरंग दलाचे कार्यकर्ते याविषयी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना म्हणाले, ‘‘बायथाखोल, बोरी येथे पोलिसांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी संबंधित वाहन अडवले होते. या वेळी एका गोरक्षकाने वाहनात गोमांस असल्याचे पाहिले आणि याविषयी फोंडा पोलिसांना माहिती देण्यात आली. वाहनासमवेत असलेली व्यक्ती हे गोमांस बेळगाव येथून आणल्याचे सांगत होती. गोमांस बेळगाव येथून आणलेले असल्यास हे वाहन गोव्याच्या तपासनाक्यावर तपासले कसे गेले नाही ? बोरी परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे गायब होत असतात आणि अशा गोवंशियांची हत्या करून त्याची वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. पोलिसांनी वाहनासमवेत असलेल्यांवर प्रथमदर्शनी अहवाल नोंद करावा आणि गोवंशियांची अनधिकृत हत्या रोखावी, तसेच सरकारने मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक मतदारसंघात गोशाळा असेल, असे पहावे.’’ पशूसंवर्धन खात्याच्या अधिकार्याने वाहनातील गोमांसाची पहाणी करून हे गोमांस खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. बायथाखोल, बोरी येथे अनधिकृत गोमांसाच्या वाहतुकीच्या प्रकरणी गोप्रेमी श्री. राजीव झा यांनीही पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकागोमांसाविषयी गोरक्षकांना माहिती मिळते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना का मिळत नाही ? |