याला मीच उत्तरदायी !
भ्रष्टाचार, महागाई वगैरे वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत.आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ?
भ्रष्टाचार, महागाई वगैरे वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत.आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ?
मतदारांना मतदानासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून उघडपणे पैसे वाटले जातात, ही जगजाहीर गोष्ट आहे; मात्र या प्रकरणी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा उमेदवारावर कारवाई झालेली दिसत नाही, हे भारतियांना लज्जास्पद आहे !
महसूल विभागाला महसूल विभागाऐवजी जनतेने (लाच) वसुली विभाग म्हटल्यास चुकीचे ते काय ?
बेळगाव येथील १६ मंदिरे सरकारने कह्यात घेण्याचे ठरवले. तेव्हा मंदिर विश्वस्त, पुजारी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याला विरोध केला. याचा परिणाम म्हणून २ दिवसांत हा आदेश सरकारने तात्पुरता स्थगित केला.
गृहमंत्री खोटे असतील, तर ती महाराष्ट्राची नामुष्की आहे.
शहरातील विविध ठिकाणी घोषित केलेल्या ‘कंटेनमेंट झोन’साठी ‘धनलक्ष्मी मंडप डेकोरेटर्स’ला ठेका देण्यात आला होता; मात्र यासाठी लावण्यात आलेल्या बांबूंचे देयक ९५ लाख रुपये काढण्यात आले. प्रत्येकी २८ सहस्र ६०० रुपये इतके देयक एका ‘कंटेनमेंट झोन’साठी लावण्यात आले आहे.
लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.
बहुतांश योजनेतील रकमा थेट कामगारांच्या अधिकोष खात्यांमध्ये जमा होतात; परंतु राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे वर्ष २०१६ पासून त्यांना ‘आर्थिक’ साहाय्य प्राप्त झालेले नाही. यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
भ्रष्टाचार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यासह त्यांची सर्व संपत्ती जप्त केली, तर भ्रष्टाचार्यांना जरब बसेल !
मार्च २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक भूमीला १४ आकडी ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक देण्याची योजना केंद्र सरकारकडून बनवण्यात आली आहे. या क्रमांकाला महसूल नोंदी, बँकेचा खाते क्रमांक आणि आधार क्रमांक हेही जोडण्यात येणार आहेत.