ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लाचखोर महिला कार्यालय अधीक्षक आणि एक खासगी इसम कह्यात !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे, २३ मे (वार्ता.) – रिक्त असलेल्या अनुदानित शिक्षकाच्या जागेवर नेमणूक करण्याचा आदेश काढण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कार्यालय अधीक्षक चित्रा भारमल (वय ३५ वर्षे) यांनी तक्रारदार यांच्याकडे ७ लाख ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या लाचेच्या रक्कमेतील ३ लाख रुपयांचा पहिला हप्ता सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलिप गजानन हिंदुराव (वय ५९ वर्षे) यांच्या वतीने घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले आहे, तर भारमल यांनी ही लाच घेण्यासाठी हिंदुराव यांना प्रोत्साहन दिले; म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. (अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी. – संपादक)