भुईंज (सातारा) येथे राजकीय हितसंबंधातून सार्वजनिक मालमत्तेचा अपहार

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा – येथील भुईंज ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकासह १८ सदस्यांनी ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता त्रयस्तांना हस्तांतरीत केली. या माध्यमातून संबंधितांनी २ लाख १७ सहस्र रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाई पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रुपेश मोरे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, भुईंज ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवक आणि १८ सदस्यांनी वर्ष २०१५ ते २०१७ या कालावधीत ५ अनधिकृत ठराव केले. या ठरावाद्वारे वरिष्ठ कार्यालयाला न कळवता, त्यांची कोणतीही अनुमती न घेता अनधिकृत कृत्य केले आहे. नियमबाह्य पद्धतीने अधिकोष खाते उघडून त्यावर रकमा जमा करून घेतल्या आहेत. संबंधितांनी ग्रामपंचायत मालकीची मिळकत त्रयस्तांना अनधिकृतपणे विक्री करण्याच्या उद्देशाने भोगवटा म्हणून दाखवण्याचा बनाव केला आणि मिळकत सुपुर्द करून वरिष्ठ कार्यालयाला ठकवले आहे. संबंधितांनी अनुमाने ३०.५ गुंठे सार्वजनिक मालमत्तेचा अपहार केला आहे.