अखिल भारतीय हिंदु महासभेकडून शाही ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुण्यासाठी न्यायालयात याचिका

ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

जोपर्यंत मंदिर अन्यत्र स्थलांतरित केले जात नाही आणि मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, तोपर्यंत मंदिर नेहमीच मंदिर रहाते !

ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय  यांची ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारे प्रा. रतन लाल यांना अटक आणि सुटका

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे म्हणजे अन्य कुणाला अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचे धाडस होणार नाही !

काशी विश्‍वनाथ मंदिराविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या कानफटात मारली !

हिंदूंच्या धार्मिक स्थळांविषयी कुणी आक्षेपार्ह विधान करत असेल, तर पोलिसांनी स्वतःहून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या लक्ष्मणपुरी येथील उमर अब्दुल्ला याला अटक !

मुसलमानांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करणे, हा आता नित्यक्रम झाला आहे. ‘सरकार अशांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केव्हा करील ?’, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे !

हिंदुद्वेषी पत्रकार आरफा खानुम शेरवानी यांच्याकडून भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे व्यंगचित्र प्रसारित

केंद्र सरकारने हिंदूच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर पोलिसांकडून स्वतःहून कारवाई करण्याचा आणि कठोर शिक्षा करण्याचा कायदा बनवून अशा घटना रोखाव्यात, असेच हिंदूंना वाटते !

श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ज्ञानवापी परिसरात सापडलेले अवशेष मंदिरांचेच असण्याची शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष
ज्ञानवापी परिसरात जे अवशेष पाहिले त्यावरून ते मंदिर असण्याचीच शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

ज्ञानवापीच्या घुमटाखाली मंदिराचे मूळ घुमट ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, आज सर्वेक्षणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्ञानवापीमध्ये अनेक गोष्टींवर प्लास्टर ऑफ पॅरिस लावून लपवण्यात आले आहे.

हिंदुत्वनिष्ठ आणि ब्राह्मण यांच्या विरोधातील षड्यंत्र जाणा अन् त्याला प्रभावी संयमाने सामोरे जा !

हे सर्व अचानक आणि उत्स्फूर्तपणे घडत नाही, तर ही एक मोठी योजना आहे, असे मला वाटते. कदाचित यात हिंदुत्वनिष्ठांना एखाद्या मोठ्या सापळ्यात अडकवण्याचे षड्यंत्रही असू शकते. हे सर्व करण्यामागची काही ठळक कारणेही येथे देत आहे. – दिनेश कांबळे