काश्मीरमधून १५० हून अधिक हिंदु  कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचे पलायन !

जे १९९० च्या दशकात झाले, त्याची परत पुनरावृत्ती होत आहे. काश्मीरमध्ये हिंदू कालही सुरक्षित नव्हते आणि आजही नाहीत. काश्मीरमधील हिंदूंचे संरक्षण न करणार्‍या पोलिसांना आणि प्रशासनाला हे लज्जास्पद !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची हत्या

जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये हिंदूंना प्रतिदिन वेचून ठार मारत असतांना कुठलाही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, साम्यवादी आदी त्याचा साधा निषेधही करत नाही, हे लक्षात घ्या !

काँग्रेसचे राज्य म्हणजे ‘पाकिस्तानी राजवट’ !

चितोडगड (राजस्थान) येथे ३१ मेच्या रात्री अज्ञातांनी रा.स्व. संघाचे संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. दुचाकी वाहनांवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी तलवारी आणि लोखंडी सळ्या यांद्वारे रत्न सोनी यांच्यावर आक्रमण करून पलायन केले.

ज्ञानवापी मशिदीतील व्हिडिओ पाहून तेथे शिवलिंग असल्याचे वाटते ! – अभिनेते अक्षय कुमार

श्री काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. यांमधील काही व्हिडिओ उघड (लीक) झाल्याचा आरोप हिंदु पक्षकारांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये शिवलिंग, त्रिशूळ आदी चिन्हे दिसत आहेत.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ज्ञानवापी मशिदीच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार

कुणी कितीही लढा दिला, तर अंतिम विजय सत्याचाच होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

तेलंगाणातील प्रत्येक मशिदीत खोदकाम करून सत्य बाहेर काढू ! – भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार पुढे म्हणाले की, देशात बाँबस्फोट होतात; कारण मदरसे आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रे बनली आहेत.

गोरबंजारा धर्मपिठाचे १०० संत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार कारवाईची मागणी !

गोरबंजारा धर्मपिठाच्या कंठवली येथे बांधण्यात येणारे शक्तीपीठ मंदिराच्या परिसरातील भक्तनिवास अनधिकृत ठरवून सिडकोने पाडून टाकले. या प्रकरणी बंजारा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरांतील देवतांच्या मूर्ती आणि शिवलिंग यांची अज्ञाताकडून तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी संबंध नाही; मात्र मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’ – असदुद्दीन ओवैसी यांचा प्रश्‍न  

बहुतांश हिंदु स्त्रियांचे अपहरण करून त्यांचा इस्लामी आक्रमकांशी विवाह लावून देण्यात आला अथवा त्यांना जनानखान्यात डांबण्यात आले, हा इतिहास आहे.

कुतूबमिनार परिसरातील २७ मंदिरांचे अवशेष कुणीही नाकारू शकत नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

कुतूबमिनार येथे पूजा करू देण्याच्या मागणीवर आज सुनावणी