सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याची साधिकेला सूक्ष्मातून जाणवलेली अलौकिक वैशिष्ट्ये !

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तो सर्वाेच्च असा दैवी उत्सव असल्यामुळे महर्षींनी त्याला ‘ब्रह्मोत्सव’, असे संबोधले आहे.

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात पार पडला चंडी याग !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली.

तिन्ही मोक्षगुरूंनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांचे महत्त्व  

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्या ठिकाणी साक्षात् श्रीमन्नारायणाचे तेजस्वरूप असणारा सूर्यनारायणच त्याच्या सात पांढर्‍या अश्वांच्या रथावर आरूढ होऊन भूलोकी अवतरणार होता. त्यामुळे सूर्यनारायणाचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपित करणारे केशरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांनी परिधान केले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवरूपी’ ८१ व्या जन्मोत्सवाचे  कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

वैशाख कृष्ण पक्ष षष्ठीच्या शुभतिथीला फर्मागुडी, गोवा येथील मैदानावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सवा’च्या रूपात अत्यंत हर्षाेल्हासात साजरा झाला. हा सोहळा इतका भव्य आणि दिव्य होता की, या सोहळ्याला उपस्थित असणार्‍या साधकांना हा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पाहिल्याचे पूर्ण समाधान लाभले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी संत आणि मान्यवर यांनी अर्पिलेली कृतज्ञतासुमने !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला अनेक संत, मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते. त्यापैकी काहींनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत देत आहोत. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना !

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेनुसार येथील सनातनच्‍या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्‍या मंदिरात देवीच्‍या पादुकांची प्रतिष्‍ठापना भावपूर्ण वातावरणात करण्‍यात आली.

महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेले विधी आणि त्यांची क्षणचित्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मनक्षत्राच्या देवतेसाठी हवन आरंभ झाल्यावर वातावरण अकस्मात् आल्हाददायक होऊन थंड हवेचा झोत यज्ञस्थळाच्या दिशेने आला. त्या वेळी ‘ही परात्पर गुरुदेवांच्या अवतारत्वाची प्रचीती आहे’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हंपी (कर्नाटक) येथील माल्यवंत पर्वताच्या स्थानी असलेल्या ‘श्री रघुनाथ मंदिरा’चे घेतलेले दर्शन !

हे भव्य मंदिर पहातांना ‘त्या काळी एका पर्वतावर एवढे मोठे दगड नेऊन मंदिर कसे बांधले असेल ?’, याची कल्पनाही करवत नाही. खरेच, आपले महान पूर्वज, दैवी आणि धर्मशास्त्रसंपन्न शिल्पकार अन् त्यांना राजाश्रय देणारे राजे यांना आमचा कोटीशः प्रणाम !

हिंदु राष्ट्रात सर्व स्तरांवर ‘अध्यात्म’ हाच पाया असल्याने रस्त्यावरील फलकही साधनेच्या दृष्टीने पूरक असतील !

हिंदु राष्ट्रात रस्त्यावरील फलक हे आध्यात्मिक स्तरावरील असतील. यामध्ये साधनेचे थोडक्यात महत्त्व फलकावर लिहिले जाईल. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करा !’, असे लिहिले जाईल. तसेच घाटरस्त्याला आरंभ होण्यापूर्वी असलेल्या फलकावर ‘येथे २ मिनिटे थांबून देवाला प्रार्थना आणि नामजप करा !’, असे लिहिले जाईल.