कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी रेखाटलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चित्राचे एका संतांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

कर्नाटक राज्यातील बळ्ळारी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे त्या स्वतः, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची चित्रे काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांना पाठवलेल्या छायाचित्रांवरून त्यांनी ३ तैलचित्रे रेखाटली. ही तैलचित्रे सुंदर आणि हुबेहूब झाली आहेत. त्यांच्याकडे पाहून आध्यात्मिक स्तराच्या विविध अनुभूती येतात. तसेच ‘ती चित्रे नसून प्रत्यक्ष त्या व्यक्तीच आपल्यासमोर आहेत’, असे जाणवते; म्हणून त्या चित्रांना ‘सजीव चित्रे’ संबोधणे अधिक योग्य ठरेल. यांतील श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चित्राचे एका संतांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. याचे वैशिष्ट्य असे आहे की, हे चित्र कुणी काढले आहे, याविषयी त्या संतांना काही ठाऊक नव्हते.

१. एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

१ अ. भाव

डॉ. व्यंकटेश काळे

१ अ १. भावाचे वलय चित्रात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होणे : याचे कारण चित्रकाराने कलाकृती भावपूर्ण रेखाटली असून चित्र काढतांना चित्रकारातील भाव कुंचल्यामधून (‘ब्रश’मधून) चित्रात उतरला आहे.

१ अ २. भावाचे वलय चित्रात कार्यरत होऊन ते हळूवारपणे वातावरणात प्रक्षेपित होणे : चित्रकारात भाव असल्याने असे झाले आहे.

१ आ. चैतन्य

१ आ १. चित्रात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देहाभोवती चैतन्य निर्माण होऊन ते कार्यरत होणे : याचे कारण चित्रकाराने कलाकृतीतील प्रत्येक अवयव भावपूर्ण रेखाटला असून चित्र काढतांना चित्रकारातील भाव कुंचल्यामधून (‘ब्रश’मधून) चित्रात उतरला आहे.

१ इ. आनंद

१ इ १. आनंदाचे कण चित्रात कार्यरत होणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आध्यात्मिक स्तर उच्च असल्याने, तसेच चित्रकारात भाव असल्याने असे झाले आहे.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चित्राविषयी जाणवलेली अन्य वैशिष्ट्ये

अ. ‘मोनालिसा’चे चित्र काढण्यास अनेक वर्षे लागली; परंतु या चित्रकाराने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे चित्र तुलनेत अगदी अल्प कालावधीत काढले. तसेच त्याने हे चित्र सहजतेने आणि भावपूर्णरित्या काढले आहे. चित्रकारात असलेला भाव यात जाणवतो.

आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे या चित्रामध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने आली आहेत.

इ. या चित्राकडे पाहून चांगले वाटत असून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या डोळ्यांत सजीवता जाणवते.’

– एक संत (२९.१.२०१८)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.